महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बोलताना ते म्हणाले की उद्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अथवा माझ्या शिवसैनिकांचे रक्त सांडू नये याकरिता मी माझ्या पदाचा त्याग करत आहे आज पर्यंत जे मला आपण सहकार्य केलं त्याकरिता मी आपला आभार व्यक्त करतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देताना म्हटले.