आगर : ग्रामपंचायतीच्या वतीने मागील चार दिवसांपासून गावाच्या परिसरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. भागातील सुशोभीकरनात भर पडावी याकरिता स्वस्तिक आकारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा, मंडळ अधिकारी यांनी शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र आगर येथे झालेल्या वृक्षारोपणाची पाहणी करत त्यांनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय नाथक, वैद्यकीय सर्व कर्मचारी, सरपंच निशा शिरसाट, किशोर खोले, सदानंद काळणे, भूषण कराळे, तलाठी अलका पाचपोर, गोपाल जामनेकर, स्वस्तिक संकल्पनाकार नाथन उपस्थित होते.