केआरकेचे ‘ते’ ट्वीट चर्चेत!

Entertainment

बिग बी आणि शाहरुख सोडून सर्व दहावी नापास”, नुकतंच केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्यांवर टीका केली आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तो अनेकदा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. विशेष म्हणजे तो त्याच्या ट्वीटद्वारे कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो. तसेच तो अनेकदा सोशल मीडियावर विविध मत मांडताना दिसतो. नुकतंच केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्यांवर टीका केली आहे.

दरम्यान अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. ‘बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर हा देखील उच्चशिक्षित आहे’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आर माधवन’ असा सवाल कमेंट करत विचारला आहे. त्याच्या या ट्विटवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी हे अगदी खरं आहे, असे म्हटले आहे.
कमाल आर खानने नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणाला, “बॉलिवूडमध्ये फक्त दोनचं सुशिक्षित स्टार्स आहेत. यातील पहिले नाव म्हणजे अमिताभ बच्चन आणि दुसरे शाहरुख खान. हे सोडले तर बाकी सर्व दहावी नापास आहेत. पण तरीही हे सर्वजण या दोन महापुरुषांशी तुलना करत आहेत. कोणत्याही क्षेत्रात शिक्षण आवश्यक असल्याचा हा पुरावा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *