सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत

अकोला

आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक
आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम काय आहे


सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 22 जुलै 2022 रोजीचे आदेश व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्‍या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्‍या, नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत झाला आहे, अशी माहिती ग्रा.पं.,जि.प.,पं.स. निवडणुक प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

  1. मंगळवार दि. 26 जुलै 2022 रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.
  2. शुक्रवार दि. 29 जुलैपर्यंत विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांचा मागासवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत काढणे.
  3. सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे.
  4. सोमवार दि. 1 ते 3 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे.
  5. बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अभिप्राय देणे.
  6. शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना-अ) जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे.
  7. बुधवार दि. 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला(नमुना अ) व्यापक प्रसिद्धी देणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *