चंद्रीका नदीला आलेल्या पुरात अमीनपुर येथील शेतकरी गेला वाहून

अकोला


अकोट : अकोट तालुक्यातील मुडगांव येथुन जाणाऱ्या चंद्रीका नदीला आलेल्या अचानक पुरात अमीनपुर येथील शेतकरी शेतातुन घरी जात असताना शेतकरी मुंगुटराव नागोराव ढगे वय ४०वर्षे हे काल दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता चे दरम्यान वाहुन गेले असता त्याचा मृतदेह लामकाणी जवळील शहापुरातील नदिवरील पुलाजवळ आढळून आला या बाबतीत मुडगांव येथील पोलिस पाटील बाळकृष्ण भगेवार यांनी अकोट ग्रामीण व तेल्हारा पोलीस स्टेशन ला माहिती दिली व सदर मृतदेह आढळला ते घटनास्थळ तेल्हारा पोलीस स्टेशन चे हद्दीत येत असल्याने तेल्हारा पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवच्छदनासाठी अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.यावेळी अकोट तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी व मृतक शेतकऱ्यांचे कुटुंबाला भेट दिली.ढगे यांच्या मागे पत्नी,२मुले असा परीवार आहे.काल अचानक आलेल्या पुराने सदर शेतकरी वाहुन गेल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *