आर आर सी न्यूज तथा सिटी न्युज सुपरफास्ट प्रस्तूत
आझादी ७५ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन
लहान मुलांच्या कलागुणांना देणार वाव
स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचा जागर करण्यासाठी पश्चिम विदर्भातील अग्रेसर आरआरसी नेटवर्क आणि सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी ७५’ या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शहरातील रत्नम लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आहे. तीन गटात असलेली ही स्पर्धा सर्वांसाठी विनामुल्य आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांची अभिमानास्पद परंपरा सर्वांच्या मनासमोर ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. पॅâन्सी ड्रेस कॉप्मिटिशन मध्ये गट अ मध्ये नर्सरी ते यू केजी, गट ब इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी आणि गट ब इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. अ गटासाठी प्राणी, पक्षी, कार्टून पात्रे देण्यात आली आहेत, तर ब आणि क गटासाठी कोणत्याही ऐतिहासिक वा पौराणिक पात्रांचा विषय देण्यात आला आहे. प्रत्येक गटाला स्वतंत्र पारितोषिक असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदणी करीता तथा अधिक माहितीकरिता ८६ ०५ ०९ ५७४४, ९८ २३ ४३ ०६ ५०, ९६ ८९ ७१ १६८८, ९८२३२ १४३५९ आणि ८६ ५७ ९०७०९८ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल शहरातील अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धेत विद्याथ्र्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुलेखनकार गजानन घोंगडे यांनी केले आहे.