विदर्भाच्या अनुशेषात पश्चिम विदर्भ मागासच
अकोल्याच्या शिवनी येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खाजगी जमीन भूसंपादन अभावी रखडलेले आहे. यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी केली. ही मागणी करताना त्यांना नागपूरकडे निधी वळता करताना पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढल्याची टिका केली.
शिवणी येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खाजगी जमीन भूसंपादन अभावी रखडलेले आहे. खाजगी जमीन संपादनासाठी सुमारे ७८.९९ कोटी रुपये मागणी प्रस्ताव शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत असणे, त्यामुळे राज्य शासनाकडून खाजगी जमीन अधिग्रहण करण्यात चाल ढकल होणे, सदर विमानतळ तातडीने सुरु झाल्यास पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिमहिंगोली या पाच जिल्ह्यांचा विकास साध्य होईल असे मत आ.सावरकर यांनी मांडले.