जिल्हा नियोजन समितीच्या ९ जागांसाठी मतदान

अकोला


एकूण सोळा उमेदवार होते रिंगणात
जि.प. सदस्य रायसिंग राठोड अविरोध


जिल्हा नियोजन समितीच्या नऊ जागांकरिता आज मतदान घेण्यात आले, त्या करिता आज ५३ जिल्हा परिषद सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.


नियोजन समितीच्या रिक्त दहा जागांवर जिल्हा परिषद सदस्यांमधून निवड करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीत एका उमेदवाराची अविरोध निवड झाली. उर्वरित नऊ जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. निवडणूक रिंगणातील जिल्हा परिषदेच्या १६ सदस्य उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य आज मतदानाचा हक्क बजावून केला. जिल्हा परिषद सदस्यांमधून निवड करावयाच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रायसिंग राठोड यांचा एकमेव अर्ज कायम राहिल्याने त्यांची अविरोध निवड निश्चित झाली. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या उर्वरित नऊ जागांकरिता १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतदान प्रक्रिया ही अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आली असून यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *