‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’ सिरीजचा सोशल मीडियावर बोलबाला, प्रेक्षकांचा मिळतोय तुफान प्रतिसाद

Entertainment

‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’ ही हॉलिवूडची वेब सिरीज शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. परदेशाप्रमाणेच भारतातदेखील या सिरीजचे अनेक चाहते आहेत. या सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या सिरिजच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अखेर प्रेक्षकांची ती प्रतीक्षा संपून अनेकांनी ही वेब सिरीज आतापर्यंत बघितली आहे. सोशल मीडियावर सध्या या वेब सिरीजचा बोलबाला आहे.

शुक्रवारी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. ती प्रदर्शित झाल्या झाल्या काही तासातच भारतातून शेकडो प्रेक्षकांनी तिचा आस्वाद घेतला. सोशल मीडियावर प्रेक्षक या सिरीजचे भरपूर कौतुक करताना दिसत आहेत. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक अशा विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर पोस्ट्स शेअर करत प्रेक्षक त्यांना ही वेब सिरीज आवडल्याचे सांगत आहेत.

या वेब सिरीजबद्दल बोलताना एका नेटकऱ्याने लिहिले, “ही मी आतापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम वेबसिरीज आहे.” दुसऱ्याने लिहिले, “उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, उत्कृष्ट मांडणी…” तर एक नेटकरी म्हणाला, “ही वेब सिरिज अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षाही वरचढ आहे.” अनेकांनी या सिरीजमधील कलाकारांच्या कामाचेही कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *