
जवळपास दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. आज शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
अकोला शहरात सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे मानाचा गणपती असलेला बारा भाईचा गणपती हा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे अकोला शहरातील जय हिंद चौक येथे बाराभाई या मानाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे गणेश भक्तांमध्ये एक उत्साहाचा वातावरण निर्माण झाले आहे शहरातील सर्वच प्रमुख मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला असून रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक चालणार आहे

