अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-२ (Aspire-2 ) नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.