
मुर्तिजापूर : भाजपा किसान मोर्चेच्या वतीने गांजर गवत निर्मूलन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व पुंडलिक महाराज यांच्या पुण्यतिथीचे अवचित्य साधून श्री पुंडलिक महाराज मंदिर पुंडलिक नगर मुर्तिजापूर येथील मंदिर परिसरातील काही भागांमध्ये गांजर गवत वाढले होते ते पूर्णपणे कापून तेथील जागा स्वच्छ करण्यात आली.आमदार हरिष पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष पुंडलिक महाराज संस्थान विठ्ठलराव पातोंड,भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सबाजकर यांच्या उपस्थित व भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील ठोकळ यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कमलाकर गावंडे,तालुका सरचिटणीस ग्रामीण विजय डोईफोडे,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र इंगोले,शहर सरचिटणीस अविनाश यावले,गजानन नाकट,सिरसो सर्कल प्रमुख राजेंद्र काळे,नितीन मुगुळ,संतोष गोलाईत,बबलू भेलोंडे,भैय्या ठाकूर,सचिन खरतडकर,अशोक मालधुरे,गणेश साखरे,राहुल खाडे, रोहित गौतकर,सिरसो ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वानखडे,वैभव गुडसुंदरे,यश डोकारे,विक्की मोहोड,सागर बायस्कर,सौरभ वायकर, रोहित भोसले,यश वानखडे,बिट्टू शिंदे,नैतिक पवार,तन्मय पवार,कल्पेश खोत आदींची उपस्थिती होती.