जयपुर येथील पश्चिम विभागीय स्पर्धेतील अजिंक्यपद प्राप्त खेळाडूंचे उत्फुर्त स्वागत

अकोला


 मूर्तीजापुर :  जयपुर (राजस्थान) नुकत्याच संपन्न झालेला पश्चीम विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष  अजिंक्यपद तर महिला संघाने उपविजेतेपद पटकाविले. या विजयी संघात मूर्तिजापूर शहरातील सागर भुरे क्रीडा शिक्षक (अकॅडमीक हाईट) कर्णधार अवनी पवार श्रेयस देशमुख ऋषिकेश घडेकर तर आदित्य सोनवणे व मुक्ता भिंगारे यांचा संघ व्यवस्थापक  म्हणुन समावेश होता. मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन वर सर्व खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्व खेळाडूंचा सत्कार  व स्वागत करून खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता यांना अभिवादन करून शहरातुन रॅली काढण्यात आली.या वेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री भूषण कोकाटे शहर अध्यक्ष श्री रितेश शाबाजकर माजी शहर अध्यक्ष श्री भारत भाऊ भगत वंचित बहुजन आघाडीचे  नेते श्री संजय भाऊ नाईक श्री गंपुभाऊ शर्मा  राष्ट्रवादी काँग्रेस चे आनंद पवार महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन चे महासचिव अतुल इंगळे अकोला जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष श्री विवेक भाऊ शिंदे सहसचिव ज्ञानेश टाले महानगर चे सचिव राहुल वानखेडे श्री सुभाषराव देशमुख श्री दिवाकर भाऊ सोनवणे  राष्ट्रीय खेळाडू श्री गौरव पावाडे  आशुतोष दुबे भुषण परोडकार  तसेच विविध संघटना व संस्थे कडून श्री दिनेश श्रीवास श्री रवि चौव्हान श्री सुनील भोजगढीया श्री चौबे श्री माढगुळकर  श्री विलासभाऊ वानखेडे तसेच क्रिडा प्रेमी पालक क्रिडा संघटक विविध सामाजिक संस्था  सदस्य  खेळाडू वृंदावन नगर व केसरी नंदन नगर येथील रहिवाशी  यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *