Eknath Khadse : हे गणपती बाप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदबुध्दी दे.., खडसेंचं गणरायाकडे साकडं

Maharashtra State

जळगाव : ‘सद्यस्थितीत गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे या बुद्धीच्या देवतेला मी विनंती करतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धी दे आणि मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार कर तसेच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त कर…’ असं साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गणपती बाप्पाकडे घातलं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त जळगाव येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोशात स्वागत करण्यात आले. स्वागत सत्कारानंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते.

सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शिंदे सरकारमध्ये साशंकता’

सुप्रीम कोर्टाचा निकाल येण बाकी आहे. या निकालाबाबत शिंदे सरकारमध्ये साशंकता असावी, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबवला. तसेच पालकमंत्र्यांच्या सुद्धा नियुक्त्या लांबविल्या असाव्यात, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.

शेतकऱ्याला समाधानी कर, अशी बाप्पाकडे प्रार्थना

राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीच संकट कोसळल आहे. या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त कर, देशावर जे महागाई संकट आहे, जगभरावर जे अनुवस्त्र युद्धाचं जे संकट आहे, ते बाप्पाने दूर करावं, विविध संकटातून देशाला राज्याला जगाला दूर करावं, शेतकऱ्याला समाधानी कर, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *