प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा भांगडा करतानाचा फोटो, तुम्हाला ओळखता येतंय का?

अकोला

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांचे जुने फोटो शेअर करताना दिसत आहे. यातील अनेक कलाकार हे शाळेच्या काळातील फोटो शेअर करताना दिसतात. नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती भांगडा करताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे.

सोनाली ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले आहे. नुकतंच सोनाली कुलकर्णीने या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने भांगडा करतानाचा फोटो शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटातील पात्राचे काही फोटो शेअर केले आहे. त्यासोबतच तिने तिच्या शाळेच्या कार्यक्रमाचे एक फोटोदेखील शेअर केला आहे. त्याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.“तमाशा लाईव्ह हा संजय जाधव यांचा म्यूझिकल चित्रपट करण्याची संधी मिळाली…आणि त्यानिमित्ताने भारतीय लोकनृत्याचे वेगवेगळे प्रकार सिनेमात करायला मिळाले…आणि ही सगळी गाणी कथानक पुढे नेतात. भांगडा हे गाणं एका नवीन पात्राची ओळख करून देतं…अस्खलित मराठीत क्षितीज पटवर्धने हा भांगडा लिहिलाय. अमित राज यांचं संगीत, वैशाली सामंत यांनी गायलंय आणि उमेश जाधव यांच नृत्य दिग्दर्शन आहे. P.S. मी लहानपणी शाळेच्या स्नेहसम्मेलनात “भांगडा” केला होता त्यानंतर आता…”, असे सोनाली कुलकर्णीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *