कुलरचा सिजन संपल्यावर पॅâक्टरी लागली आग ?
विमा क्लेम मिळविण्यासाठी लागली का आग ?
वित्तीय संस्थांचे कर्ज कसे पेâडणार संस्था ?
अकोला,
आज सकाळी ही आग लागली आहे. मलकापूर परिसरात अंध विद्यालयाच्या बाजुला असलेल्या सालासार या इंडस्ट्रीजला ही आग लागली. नियम धाब्यावर बसवून आणि स्थानिक नागरीकांचा विरोध डावलून ही पॅâक्टरी गेल्या बारा वर्षापासून येथे कार्यरत आहे. नागरीकांच्या जीवाला आज या आगीने धोका निर्माण झाला होता. पॅâक्टरीत सिलिंडर, कॉम्प्रेसर आदी गोष्टी असताना या पॅâक्टरीत आग लागल्यानंतर ती विझविण्याची कुठलिही यंत्रणा नव्हती. स्थानिकांनी स्वतःचे जीव वाचविण्यासाठी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
रहिवासी भागात पॅâक्टरी टाकण्याची परवानगी यांना कोणी दिली असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. या पॅâक्टरीत सिलिंडर, क्रॉम्प्रेसर आहेत. इथे आग लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पॅâक्टरीत कुठलीच सोय नव्हती. त्यामुळे आग अधिक भडकली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या येई पर्यंत या भागातील नागरीकांनी जीव मुठीत ठेवत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बाजुला अंध विद्यालय असताना अशा प्रकारे रहिवासी भागातील ही पॅâक्टरी कुणाच्या परवानगी सुरु होती हा संशोधनाचा विषय आहे. या पॅâक्टरीचे फायर ऑडीट झाले होते काय असा नवा प्रश्न समोर येतो. आगीने उग्र रूप घेऊ नये यासाठी स्थानिक रहिवाशांनी आग विझविण्याचा स्वतः प्रयत्न केला. पॅâक्टरीत सिलेंडर, कॉम्प्रेसर. होते. मोठा धोका होण्याची शक्यता होती. स्थानिक रहिवाशांचा या कुलर कारखान्याला विरोध असताना तो इथे सुरु कसा असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिका प्रशासकांनी अशा उद्योगांना शहराबाहेर नेण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच ते तात्काळ बंद करण्याची गरज आहे.