
अकोला,
अकोल्याचा उड्डाणपुल हा पिकनिक स्पॉट झाला आहे.पण, या उ़ड्डाणपुलावर लखलखणारे दिवे हे चोरीच्या विंâवा अनधिकृत कनेक्शन मधुन घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका खांब्यावरुन थेट कनेक्शन जोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
उदघाटन झालेला उड्डाणपुल हा पिकनिक स्पॉट झाला आहे. या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी रात्री नागरीकांची मोठी झुंबड उडत आहे. पण, या पैकी एका उड्डाणपुलावरील पथदिवे हे अधिकृत विज कनेक्शन न घेता थेट पोलिस वसाहतीसमोरुन थेट वीजेचे कनेक्शन जोडण्यात आले आहे. ही चुक कोणाची असा प्रश्न या निमित्त समोर येत आहे. या ठिकाणी अधिकृत स्ट्रीट लाईट पोलवरुन हे कनेक्शन घेण्याची गरज होती. पण, तसे झाले नाही. थेट आकोडा टावूâन हे कनेक्शन घेण्यात आले आहे. महापालिकेकडे हे पुल हस्तातरीत झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या स्ट्रीट लाईट पोलवरुन वीज गेली कशी असा ही मुद्दा समोर येत आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने या दोन्ही उड्डाणपुलासाठी स्वतंत्र मिटर घेत हे उड्डाणपुल उजेडात आणले आहेत काय असा प्रश्न उपस्थित होतो. तशी कुठलिही परिस्थितीत उड्डाणपुलावर दिसत नाही.

