हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत वंचितच्या लिना शेगोकार विजयी

अकोला ताज्या घड्यामोडी ब्रेकिंग


शिवसेनेला पराभूत, महाविकासला धक्का,

अकोला,६ जुन
जिल्हा परिषदेच्या हातरुण पोटनिवडणूकीत आज वंचित उमेदवार लिना शेगोकार यांचा विजयी झाल्या आहे. वंचित उमेदवार लिना शेगोकार यांनी १६४१ मतांनी शिवसेना उमेदवार अश्विनी गवई यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, जिल्हा परिषदेतील सत्तारुढ वंचितला या निकालाने मोठा दिलासा मिळाला आहे.
वंचित ने शिवसेने कडून ही जागा हिसकावल्याने वंचितला या विजयाचा निश्चित फायदा होणार आहे. वंचितचे संख्याबळ वाढण्यास या निकालाचा मोठा आधार मिळाला. जुलैमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या होणाNया निवडणुकीत या निकालाने वंचित ला दिलासा मिळाला आहे. सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे संख्या बळ २५ तर महाविकास आघाडीचे संख्याबळ २३ झाले आहे. हातरूण सर्कलमधून शिवसेनेच्या सुनीता सुरेश गोरे (शिवसेना)विजयी झाल्या होत्या. मात्र नामनिदर्शेनपत्र सादर करताना गोरे यांनी सोनाळा येथील मालमत्तेचा २०१४-२०१९ पर्यंतच कर भरला नाही. तसेच मोरगाव भाकरे येथील शेत जमिनीचा उल्लेख टाळला होता. त्यामुळे त्या अपात्र ठरल्या. हातरूण सर्कलच्या पोट निवडणुकीत सात जणांचे अर्ज वैध ठरले होते. दोघांनी अर्ज मागे घेतले होते. वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार यांना ४३०१ मते मिळाली तर शिवसेनेच्या अश्विनी गवई यांना २६६० मते मिळाली, भाजपाच्या राधिका पाटेकर यांना २०९१ मते मिळाली. काँग्रेसच्या रशिका इंगळें यांना ३६२ मते मिळाली अपक्ष अनिता भटकर ३९ मते मिळाली. जिल्हा परिषदेत आता वंचित-२५ सदस्य, शिवसेना-१३, भाजप-०५, काँग्रेस-४, राकाँ-४, प्रहार-१ अािण दोन अपक्ष, असे पक्षीय बलाबल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *