अमरावती विभागात मुलींनी मारली बाजी

अकोला ब्रेकिंग

अमरावती विभागाचा एकूण निकाल ९६.३४ घोषित
मुलींची पास होण्याची टक्केवारी ९६.९४
मुलांची पास होण्याची टक्केवारी ९५.८२

अकोला,८ जुन
आज बारावीच्या निकालात मुलींनेच बाजी मारल्याचे चित्र आहे. अमरावती विभागाचा निकाल ९६ टक्के लागला आहे. तर विभागात मुलांची पास होण्याची टक्केवारी ही मुलीं पेक्षा कमी असल्याचे चित्र आहे.
बारावीचा आज निकाल लागला. या निकालात अकोला जिल्ह्याचा निकाल पाहिल्यावर अकोला जिल्ह्यात देखील मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. अकोला जिल्ह्यात मुलींचा ९७ टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा ९५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याचा एकूण निकाल हा ९६ टक्के लागला. बार्शिटाकळी तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला असून सर्वात कमी निकाल हा तेल्हारा तालुक्याचा लागला आहे. जिल्ह्यात २६ हजार विद्याथ्र्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. पैकी २४ हजार ८६९ विद्यार्थी पास झाले. १३ हजार १८१ मुले तर ११ हजार ६८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. भाषेमध्ये गुजराती विषयाचा निकाल शतप्रतिशत आहे. जिल्ह्यात सायन्स चा ९९ टक्के, कला शाखेचा ९२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९७ टक्के, व्होकेशनलाचा ९१ टक्के निकाल आज लागला.

संकेत स्थळावर पहा निकाल

१. या लिंकवर क्लिक करा, टच करा आणि पहा बारावीचा निकाल

२. या लिंकवर क्लिक करा, टच करा आणि पहा बारावीचा HSC Result निकाल

3.या लिंकवर क्लिक करा, टच करा आणि पहा बारावीचा निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *