मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. आतापर्यंत अनेक आमदार तसेच स्थानिक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना आमदारांनंतर आता १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (१९ जुलै) दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडू शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बंडखोरी होणार याची कल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती, असे राऊत म्हणाले आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.