अधिकाऱ्यांना दिल्या पंचनामा करण्याच्या सूचना
नागरिकांच्या नुकसानीचीही करण्यात आली पाहणी
अकोला – अतिवृष्टी, पुरामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसानाची पाहणी करून आमदार सावरकर यांनी तातडीने पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
भाजपा चे आमदार रणधीर सावरकर यांनी आज सकाळी मुंबई इथून राष्ट्रपतीच्या निवडणुकीची मतदान करून आल्याबरोबर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात तहसीलदार व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली. अकोला महानगर तसेच ग्रामीण भागातील शेतकरी ग्रामस्थांना आधार देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे उमरी येथील ताथोड नगर, प्रभाग क्रमांक चार मोठी उमरी येथे नेहरूनगर अवस्थी ले आऊट येथे नाल्याची पाहणी केली तसेच आपा तापा, सांगडुद, रामगाव, दहीगाव, धोतर्डी, सांगळुद व मैसांग अनेक गावांना भेट देण्याचा संकल्प त्यांनी केला. व नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले असता त्या ठिकाणची पाहणी करीत मोठ्या प्रमाणात पावसा मुळे नुकसान झालेल्या शेतीचे निरीक्षण केले, आमदार रणधीर सावरकर यांच्या सह अकोला तहसीलदार सुनील पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.