ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. हे संपूर्ण प्रकरण ताज असतानाच अभिनेता आरोह वेलणकरने याबाबत ट्विट केलं आहे.‘बिग बॉस’ मराठी या कार्यक्रमामुळे अभिनेता आरोह वेलणकर प्रकाशझोतात आला. सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणाऱ्या कलाकारांमध्ये आरोहचा नंबर टॉपला आहे. राजकीय मुद्द्यांवर देखील तो आपलं मत खुलेपणाने मांडताना दिसतो. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींबाबत त्याने आपलं मत ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केलं.