
बॉलिवूडमधील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक असलेली मलायका अरोरा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायका अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहे. मलायका आघाडीच्या तरुण अभिनेत्रींनाही फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते. मलायका नेहमीच सोशल मीडियावर फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. इन्स्टाग्रामवर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. आता मलायका एक फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी मलायका अरोरा तिच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती योगा प्रशिक्षकासोबत योग करताना दिसत आहे. तिचा व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. मलायका या व्हिडीओमध्ये आपलं शरीर स्ट्रेच करताना दिसत आहे. ४८ वर्षीय मलायकाच्या शरीराची लवचिकता तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारी आहे.