अनोळखी व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार
अनेकांच्या अंत्यविधीचा खर्च उचलतो परा
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे रुग्ण कल्याण समिती सदस्य पराग गवई यांनी पुन्हा सामाजिक दायित्व निभावित अनोळखी पाच जणांवर अंत्यसंस्कार केले. त्यामध्ये दोन युवकाचा सुद्धा समावेश आहे.
दोन व्यक्तीचे नुकतेच निधन झाले. पण, त्यांचे नातेवाईक समोर आले नाहीत. अकोट फाईल परिसरातील एक आणि खदान पोलिस स्टेशन मधील एक ज्येष्ठ नागरीक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक कोणी समोर आले नाही. त्यामुळे या अनोळखी व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सामाजिक कार्यकर्ता पराग गवई हे पुढाकार घेतात. पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला पण, त्यात पोलिसांना यश आले नाही. अखेर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ता पराग गवई याच्या सोबत त्यांचा मित्र परिवार मदतीला धावून येतो. ज्यांचे कोणी नातेवाईक नाहीत. अशांच्या अंत्यसंस्कारासाठी पराग गवई यांनी सामाजिक भुमिका घेत ते इतरांच्या मदतीला धावून जातात. यात त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार मोलाची मदत करतो. पोलिस देखील अनोळखी इसमाच्या अंत्यसंस्कारासाठी पराग गवई यांना हक्काने हाक मारतात.