बस थांब्या चा स्लॅब कोसळून युवकाचा मृत्यू
बार्शीटाकळी तालुक्यातील घटना
बचाव पथकाने युवकाला बाहेर काढले
शनिवारी रात्री शिकस्त झालेल्या बस थांब्याचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बस थांब्याच्या निवाNयाखाली फोनवर बोलत असलेल्या युवकावर हा स्लॅब कोसळल्याने युवक स्लॅब खाली पूर्णपणे दबला गेल्याने त्यांचा दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला.
बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर इथे बस थांब्यावरील प्रवासी निवारा शनिवारी अचानक रात्री साडेनऊ वाजता कोसळला. या दुर्घटनेत विकी कोकरे याचा जागीच मृत्यू झाला. विकी हा प्रवासी निवाNयाखाली फोनवर बोलत असताना अचानक प्रवासी निवाNयाचा स्लॅब कोसळला, अन् तो स्लॅब खाली दबला.या घटनेची माहिती मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देण्यात आली. त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले अन् स्लॅब फोडणे सुरु केले. अवघ्या २० मिनिटात स्लॅब खाली दबलेला युवकाला बाहेर काढले. तोपर्यत या दुर्घटनेत विकीचा मृत्यू झाला होता. यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पीएसआय बंडू मेश्राम हे घटनास्थळी उपस्थित होते.