विधी महाविद्यालयात फी मध्ये होते अफरातफर

अकोला

अकोला : दरवर्षी संत गाडगेबाबा विद्यापीठा अंतर्गत येत असलेल्या अकोला शहरातील श्री नथमल गोयनका विधी महविद्यालय व अकोला विधी महाविद्यालय या ठिकाणी दरवर्षी अनेक विद्यार्थी हे तीन वर्षीय व पाच वर्षीय विधी व एलएलएम या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतात व प्रवेश शुल्क विद्यापीठ व एफआरए हे शुल्क ठरविल्याप्रमाणे घेण्यात येतात किंवा या व्यतिरिक्त सदर महाविद्यालय शुल्क घेतात. असे असतांना या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाआधी कुठलीही सूचना न देता व प्रवेशानंतर अतिरिक्त उपरोक्त शुल्क भरण्याचा तगादा लावण्यात येतो. या बाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक वर्षापासून शिक्षणाच्या नावावर पैश्याचा काळा बाजार करण्याचा सदर विधी महाविद्यालय करीत आहे. त्या ठिकाणी शिक्षण घेणारे, प्रवेश घेणारे ८० टक्के विद्यार्थी हे मागासवर्गीय व अनुसूचित प्रवर्गातून येत असतांना सुध्दा या विद्यार्थ्याकडून हे शुल्क 29.8.2022 आकाररून शिक्षणाच्या नावावर पैश्याचा जोड धंदा या महाविद्यालयीन प्रशासनाकडून चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणाची गांभीर्यान दखल घेत दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करून दखलपात्र कार्यवाही करण्यात यावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.लॉ स्टुडन्ट असो. अकोला चे अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *