व्हिडिओ कॉल उचलताच स्क्रिनवर आली नग्न तरुणी, ७६ वर्षीय वृद्धाचे जीवन बनले नरक

क्राइम

नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधून निवृत्त होऊन आनंदी जीवन जगणाऱ्या एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नारिकाला सेक्स्टॉर्शनचे पुरते हैराण करून सोडल्याची एक घटना उघड झाली आहे. निवृत्तीनंतर आपल्या मुलांच्या घरी आनंदने राहणारे आणि सामाजिक कार्यात सतत स्वत:ला व्यग्र ठेवणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला या सेक्स्टॉर्शनच्या घटनेमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आनंदी जीवन जगणाऱ्या आणि सामाजिक कार्यात मोठा नावलौकिक असलेल्या या जेष्ठाचे जीवन ७ ऑगस्ट रोजी आलेल्या एका व्हिडिओ कॉलने नरक बनवले. सुदैवाने जेव्हा या ज्येष्ठाला हा सेक्स्टॉर्शना व्हिडिओ कॉल आला तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्रही होते. त्यांना वारंवार फोन आल्याने शेवटी त्यांच्या मित्रांपैकी एकाने या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील फोन हिसकावून घेतला. तेव्हा हा सेक्सटोर्शनचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी त्यांना हा व्हिडिओ कॉल आल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले.त्यांनी कॉल रिसिव्ह केल्यानंतर एक नग्न तरुणी समोर आली. तिने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. सुमारे दीड मिनिटे हा प्रकार सुरू होता. काही वेळाने एका तरुणीचा फोन आला, ती धमकीच्या स्वरात ५० हजार रुपयांची मागणी करू लागली. रक्कम न दिल्यास तिच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व नंबरवर अश्लील व्हिडिओ पाठवला जाईल, अशी धमकी तरुणीने दिली. ज्येष्ठ नागरिक घाबरले. यानंतर त्याला ना नीट जेवता येत होते, ना कोणाला आपली समस्या सांगता येत होती. त्यामुळे ते सतत चिंतेत होते.१० ऑगस्ट रोजी हंस भवन, ITO येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी ते आले होते. यानंतर ओळखीच्या लोकांसह ते एका खासदाराला नॉर्थ अ‍ॅव्हेन्यूवर कारमधून भेटायला जात होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना एक फोन आला. आपण सायबर क्राईमचे इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार बोलत असल्याचे पलिकडून सांगण्यात आले. एका मुलीने तुमच्यावर गुन्हा दाखल केला असून, तुम्ही कुठे भेटणार ते सांगा, असे तो बोलू लागला. ते घाबरले आणि ते त्याला आपली बाजू सांगू लागले. दुसऱ्या बाजूने कथित सायबर गुन्हे निरीक्षक धमक्या देऊ लागला.

त्यानंतर कॉल कट केल्यावर दुसरा कॉल आला. यावेळी आणखी एका व्यक्तीचा फोन आला. तुमच्याविरुद्धची तक्रार रद्द करून यूट्यूबवर पोस्ट केलेला व्हिडिओ डिलीट करू, पण त्यासाठी तु्म्हाला १७,२०० रुपये दंड भरावा लागेल, असे तो सांगू लागला. गाडीत बसलेल्या लोकांना ही बाब समजली नाही. सगळे खासदाराच्या घरी बसले होते, तेवढ्यात पुन्हा फोन आला. ज्येष्ठ नागरिक बाहेर आले आणि त्याने दुसऱ्या व्यक्तीकडून त्यांना सांगितलेल्या खात्यात रक्कम जमा करवून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *