राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोविंदा आता खेळाडू आहेत. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे सांगितले. तसेच सर्व सविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता मोकळं-मोकळं वाटतंय. छा-छान वाटतंय, असं मिश्किल भाष्यदेखील केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते.