कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिवांचे लक्ष कुठे ?
कृषी विद्यापीठातील मुलींचे वसतीगृह असुरक्षित
कृषी विद्यापीठाच्या जिजाऊ वसतीगृहात मुलींच्या वसतीगृहात मुलांची एन्ट्री रोजची झाली असून याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. सुरक्षा अधिकारी करतात तरी काय ? आणि वाॅर्डन जातात तरी कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तुम्ही पाहत असलेल्या या व्हिडीओ मध्ये स्काॅर्प घालून आत एन्ट्री करणारा हा मुलगा असून तो आता मुलींच्या वसतीगृहात चालला आहे. हा व्हिडीओ आम्ही तयार केला नसून तो व्हायरल झाला आहे. त्याच बरोबर या मुलींसोबत असलेल्या मुलीनेच हा व्हिडीओ तयार केला असावा. मुलींच्या वसतीगृहात कुठलीहा आडकाठी, विचारपुस न होता हा मुलगा या मुलींच्या वसतीगृहात गेला आहे. त्याच बरोबर त्याने उपस्थित मुलींसोबत फोटो देखील काढले आहे. या फोटोतील मुलींचे फोटो आम्ही जाणीव पुर्वक दाखविणे टाळत आहोत. कृषी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहात हा मुलगा करतो तरी काय असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरु व कुलसचिव यांचे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या मुलींच्या वसतीगृहाची ही परिस्थिती असेल तर विद्यापीठातील इतर वसतीगृहांची विदर्भात काय परिस्थिती असेल याची कल्पना केलेली बरी, असे मत विद्यापीठातील सूत्रांनी व्यक्त केले आहे. कृषी विद्यापीठाच्या परिसरातील जिजाऊ वसतीगृहातील हा प्रकार गंभीर असून विदर्भात विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असून विद्यापीठातील मुलींच्या इतर वसतीगृहाची नेमकी काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलींच्या वसतीगृहात पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुलींना शिकण्यासाठी पाठवितात आणि अशा प्रकारे मुलींच्या वसतीगृहात असुरक्षित वातावरण पाहता कृषी विद्यापीठाचे वसतीगृहात शिकण्यासाठी मुलींना पाठविण्यासाठी पालक धजावणार नाही. या सर्व प्रकरणात विद्यापीठाच्या संबंधित वसतीगृहाचे वाॅर्डन तसेच सुरक्षा अधिकारी यांची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याच बरोबर मुलींच्या वसतीगृहात सीसीटीव्ही लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून कृषी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुली शिक्षणासाठी येत असून त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा या मुळे समोर आला आहे. इतर विद्यापीठाच्या महिला अधिकाऱ्याकडे या सर्व प्रकरणाची चौकशी देण्याची मागणी पुढे येत आहे. कृषी विद्यापीठातील व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका कुणी काढला आणि तो का व्हायरल झाला याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या विषयी कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाशी संपर्क केला असता तो झाला नाही.