गणेश मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात

अकोला


गणेश मुर्तींच्या विंâमतीत चांगलीच वाढ
कोरोना संकटानंतर गणेशोत्सव


कोरोना संकटानंतर यंदा गणेशोेत्सवात मुत्र्यांच्या विंâमतीत झालेली वाढ दिसून येत आहे. सर्वच गोष्टींमध्ये वाढलेला खर्च आणि त्यामुळे मुत्र्यांच्या विंâमतीत झालेली वाढ पाहता गणेश भक्तांना मुत्र्यांसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे.


या वर्षी गणेश मूर्ती च्या उंची बाबत देखील सूट मिळाल्याने मूर्तीकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरातील दगडी पूल जवळील गुलजार पुरा भागातील मूर्तिकारांनी १५ ते २० फूट उंचीच्या गणेश मूर्ती बनविण्यास सुरुवात केली असून त्यांचे कार्य अंतिम टप्यात पोहचले आहे. या वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस व कच्या मातीच्या व मालाच्या किंमती जास्त असल्याने गणेश मूर्ती च्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण राज्यात या वर्षी कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने राज्य शासनाच्या वतीने लावण्यात आलेले सण उत्सवांसंबंधी निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात आले आहेत. मागील २ वर्षाच्या कोरोना काळात होतकरू मूर्तीकारांना चांगलाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र कुठलेही निर्बंध नसून गणेशोत्सव जल्लोषात साजरा होईल.

बाईट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *