
शेतकरी सन्मान सोहळ्याचे अनिल मालगे यांच्याद्वारे आयोजन…..
अनिल मालगे यांच्या द्वारा आयोजन
पोळा चौकात भरला बैलांचा पोळा
८० वर्षांपासून सुरु आहे परंपरा
वर्षभर शेतात कष्ट करणाNया बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासा’ी पोळ्याचा सण साजरा केला जातो. अकोल्यात ही गेल्या अनिल मालगे यांचे आजोबा दयाराम मालगे यांनी सुरु केलेली परंपरा आज ही कायम आहे. गेल्या २२ वर्षापासून शेतकरी सन्मान सोहळ्यातून उत्कृष्ट बैलजोडीला मो’ी ढाल, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येते.
ग्रामीण भागातील लोक मो’्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून मिरवणूक काढली जाते. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते लोक घरात मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात. वर्षभर शेतात राबणाNया बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासा’ी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलांना शेतीतील कामांपासून आराम दिला जातो आणि त्यांची काळजी घेतली जाते. शेती हा व्यवसाय मो’्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. अकोल्यात ही बैलांना सजवून त्यांची पूजा करून मिरवणूक काढली जाते. या दिवशी बैलांना खाण्यासा’ी पुरणपोळीसोबत इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अकोल्यातील सर्जा राजाची परंपरा कायम ‘ेवत यंदा सर्व वर्तमान पत्राचे संपादकांना पोळा चौकात आंमत्रित करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर यांची विशेष उपस्थिती होती. अशी माहिती आयोजक अनिल मालगे यांनी दिली.
त्याच बरोबर कृषी विद्यापी’ात देखील पोळा निमित्त बैलांना सजविण्यात आले होते. त्याच बरोबर त्यांची विधिवत पुजा करण्यात आली होती. तसेच खडकी चांदूर येथे पोळा उत्साहात व शांततेत पार पडला. कोरोना संकटानंतर यंदा पहिल्यांदा अशा प्रकारे सार्वजनिक रित्या पोळा उत्सव साजरा केला गेला. या उत्सवात शेतकNयांनी मो’्या उत्साहात सहभाग नोंदविला.