मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढ
रंगरंगोटी ची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात
सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, वाढत्या महागाई मध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी महागलेल्या असतील.
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अत्यावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत आणि याचा परिणाम गणेश उत्सवावरही होणार आहे. यंदा गणेश मूर्ती तयार करणा?्या कारागिरांना माती, रंग व कारागिरांचा खर्च वाढल्यामुळे महागाईचा फटका बसला याचा परिणाम मूर्तींच्या किंमतीवर देखील होणार आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाची सावट असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह कमी होता. त्याचबरोबर याचा अंदाज घेऊन मूर्तिकारांनी मूर्ती कमी केल्या होत्या. मात्र, यावर्षी मूर्तिकारांनी गणेश मूर्ती वाढवल्या आहेत. यामुळे बाजारामध्ये विविध प्रकारच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत.’गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. . संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच मूर्ती बाजारात येणार आहेत