रिसोड : वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये असलेल्या पोस्ट ऑफीस मधील एक तिजोरी काल मध्ये रात्री दरम्यान अज्ञात चोरटयांनी पडविल्याची घटना उघडकिस आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून सीसी टीव्ही च्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.
रिसोड शहरातील पोस्ट ऑफिस मधील एक तिजोरी पळविल्याची घटना 29 ऑगस्ट च्या मध्यरात्री नंतर घडली असून चोरट्यांनी पळवलेल्या तिजोरीत पावणेतीन लाख रुपयांची रोकड असल्याचे माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांनी घटनास्थळ धाव घेत परिसरातील सीसी टीव्ही च्या आधारे अज्ञात चोरटयांचा शोध पोलीस घेत आहे.
काही महिन्यापूर्वी वाशिम तालक्यातील रिठद येथे ही याच प्रकारे एटीएम मशीन चोरुन पडविल्याची घटना घडली होती.त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करुन नागरीकांना भयमुक्त करावे
अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.