गोसै रहेमत हायस्कूल अध्यक्षांनी सहकारी जागेत केले अतिक्रमण‌‌;हायस्कूल संस्थापक अध्यक्षांचा मनमानी

Uncategorized

-अतिक्रमण हटविण्यासाठी गावकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारीना निवेदन..

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू हे सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते तसेच बोरगाव मंजू गावातील वार्ड क्रमांक तीन मध्ये असलेले गोसै रहमत हायस्कूल चे अध्यक्ष डॉक्टर फिरोज खान दिलावर खान यांनी शासनाची नियमाची पायमल्ली करून व अंमलबजावणी न करता शासकीय जागेतील अतिक्रमण केले व आजूबाजूने ग्रामपंचायत ची क्लासची जमीन आहे. सदर जागेवर पिण्याच्या पाण्याची सुद्धा ग्रामपंचायतने केलेल्या आहे आजू बाजूच्या नागरिकांना पिण्याचे पाण्याची बिकट समस्या आहे. या अध्यक्षनी हातपंपा सहित अतिक्रमण केले सार्वजनिक हातपंप तसेच सरकारी जागेत अतिक्रमण केले हे सर्व बोरगाव मंजू येथील नागरिकांच्या लक्षात येताच तक्रार करते अब्दुल रशीद अब्दुल मंजीत व बरेचसे गावातील नागरिक नागरिकांनी ग्रामपंचायत ला तक्रार दिली होती परंतु सदर अतिक्रमण काढणे बाबत ग्रामपंचायत ने संबंधित अतिक्रमणधारक यांना नोटीस बजावण्यात आली होती परंतु अतिक्रम धारकांनी कुठल्याच प्रकारची नोटीस चे पालन केले नाही या अगोदर सुद्धा गोसै रहैमत हायस्कूल च्या बऱ्याचश्या तक्रारी केलेले आहेत व बरेच वेळा वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित सुद्धा झालेली आहे म्हणून गावातील तक्रार करते यांनी अतिक्रमण काढण्याबाबत अकोला जिल्हधिकारी यांना निवेदन दिले आहे एका महिन्याच्या आत अतिक्रम काढले नाही तर तक्रार करते माननीय विद्यमान न्यायालयात याचिका दाखल करतील असे सुद्धा म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *