नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहलं आहे. दिल्लीतील मद्य उत्पादन शुल्क धोरणावरुन अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. १० वर्षापूर्वीच्या एका बैठकीचा दाखल या पत्राच्या माध्यमातून अण्णा हजारेंनी केजरीवालांना दिला आहे. मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारेंनी केजरीवालांना लगावला आहे. त्यावर आता अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “भाजपाच्या नेत्यांनी मद्य धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप केला. सीबीआयनं सुद्धा घोटाळा झाला नसल्याचं सांगितलं आहे. जनता देखील त्यांचं ऐकत नाही. आता ते अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहे. राजकारणात हे सर्वसाधरण असते.”