धुळे : शहरातील इंग्रज काळातील ऐतिहासिक व मानाचा मानला जाणारा खुनी गणपतीच्या पालखीचे आज अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंगच्या गजरात आगमन झाले. हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक देखील मानला जातो. खुनी गणपतीच्या आगमना दरम्यान गुलालाची उधळण करण्यात येत नसते. अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंग वाजवत खुणी गणपती बाप्पाचे आज आगमन झाले.अशी आहे अख्यायिका
कोणी गणपती बाप्पाच्या आगमन पालखी सोहळा दरम्यान या गणेशाची स्थापना 1865 साली स्वयंभू झालेली असल्याचे मानले जाते. इंग्रजांच्या काळात 1895 साली खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. तो सातत्याने आजपर्यंत सुरू आहे, त्याला विशेष आणि वेगळी परंपरा आहे, सन 1904 या वर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात असतांना इंग्रजांकडून फोडाफोडीचे राजकारण होत होते. या गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला. काही वेळात या भांडणाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले, यावेळी उपस्थित ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला होता. ज्यामध्ये बरेच लोक मृत्यूमुखी पडले, यावेळी धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या वेळी मशिदीच्या परिसरात खून होतात अशी समजूत रुढ झाली होती. या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचे ‘खुनी गणपती’ हे नाव पडले. यानंतर तत्कालिन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यावेळी निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला होता व तेव्हापासून या खूनी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक जामा मस्जिद म्हणजेच खुणी मज्जिद समोरून जात असताना मज्जीद्दीमधील मौलाना स्वतः मज्जीतीच्या प्रवेशद्वारावर या खुनी गणपतीची आरती करतात, यामुळेच हा गणपती हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक मानला जातो.