आमिर खान आणि विजय देवरकोंडाच्या कृतीने वेधून घेतले सर्वांचे लक्ष, आलिया भट्टचे ‘ते’ वक्तव्य ठरले तंतोतंत खरे

Entertainment

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या लाइगर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. अनेक चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक या चित्रपटाच्या कथानकावरुन विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी लाल सिंग चड्ढा हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने त्याचे या चित्रपटाचे मानधन परत केले होते. त्यानंतर आता विजय देवरकोंडा यानेही लायगर या चित्रपटासाठी त्याला मिळालेल्या मानधनाची रक्कम परत केली आहे.

विजय देवरकोंडाचा पहिला बॉलिवूड चित्रपट लायगर हा सुपरफ्लॉप ठरला आहे. त्यामुळे निर्मात्यांना प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. विजय देवरकोंडाने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये घेतले होते. यातील ६ कोटींहून अधिक रक्कम तो परत करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरल्यामुळे ‘जन गण मन’च्या निर्मात्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळेच विजय देवरकोंडा आणि पुरी जगन्नाथ यांनी निर्मात्यांचे नुकसान भरून काढण्याचा निर्णय आहे. ते भरुन लढण्यासाठी विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ ‘जन गण मन’ चित्रपटासाठी मानधन न घेण्याचे ठरविले आहे. पण अद्याप त्यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘जन गण मन’ हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

तर दुसरीकडे आमिर खानने चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून कमबॅक केलं. १८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यानंतर आता आमिरने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या नुकसानाची जबाबदारी आमिरने स्वतः घेतली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून तो मानधन घेणार नाही. निर्मात्यांच्या नुकसान भरपाईसाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *