दिनांक 11 सप्टेंबर २०२२ रोजी विदर्भातील सर्वात मोठ्या व सर्वदूर नावलौकिक असलेल्या श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेची अमरावती येथे निवडणूक होत आहे. यामध्ये दोन पॅनल मध्ये लढत होत असून शिवाजी शिक्षण संस्थेचे किमान ८०० आजीवन सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रगती पॅनलचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीने २०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे शैक्षणिक व सामाजिक हिताचे विकासात्मक कार्य करून संस्थेच्या आजीवन सभासदांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले.शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित सर्व शाळा,महाविद्यालयांचे डिजिटल करणे,मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या धरतीवर विकसित करणे,संस्थेच्या सर्व शाळा,महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करून आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी भौतिक व शैक्षणिक सुधारणा करणे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयाला सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचा दर्जा मिळवून देणे, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात खाजगी रुग्णालयापेक्षा कमी दरात रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त विशेष ICu वार्ड आणि पेइंग रूमची निर्मिती करणे तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी निवास भवनाचे बांधकाम करणे, भाऊसाहेबांचे जन्मगाव पापड येथे कृषी महाविद्यालयाची शाखा सुरू करणे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय सुरू करणे त्यासोबतच कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आयोजित केलेल्या पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनीच्या स्मरणार्थ अमरावती येथे भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करणे तसेच विदर्भातील शेतकऱ्यांकरिता नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणासाठी शेतकरी जागृती अभियान राबवणे, राष्ट्रीय स्तरावर भाऊसाहेबांच्या कार्याची दखल व्हावी म्हणून कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी तथा संशोधकांचा दरवर्षी “कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार” देऊन गौरव करणे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर भाऊसाहेबांच्या जीवन कार्यावर मान्यवर व त्यांची विशेष व्याख्याने आयोजित करणे,ग्वाल्हेर येथे मराठा संशोधन केंद्र सुरू करणे इत्यादी मौलिक विशेष कार्य विद्यमान कार्यकारणीने केले असून यासोबतच इतर अनेक महत्त्वाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन संस्थेची सर्वांगीण प्रगती साधण्यात यश संपादन केले असल्याची माहिती शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष ऍड.गजानन पुंडकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.