अखेर त्या जखमी चा मृत्यू!

अकोला

नैसर्गिक आपत्तीची मागणी

अकोट तालुका प्रतिनिधी

पिंप्री-बोर्डी येथील यात्रेनिमित्त सोळा आगष्ट 2022 रोजी दहीहंडीसाठी पिंप्री येथील हिम्मत नामदेव गावंडे हे सहभागी झाले होते तेव्हा सकाळी अकरा वाजता दहीहंडीकाला संपल्यानंतर अचानक गजानन कंकाळे यांचे मंदिरासमोरील गायवाड्याची भिंत कोसळून तिथे उभे असलेले नागरीकांना इजा झाली होती काहींना किरकोळ, तर काहींना जास्त प्रमाणात मार लागला होता.
सविस्तर असे की बोर्डी येथील यात्रेनिमित्त रथ निघाल्यानंतर गजानन कंकाळे यांचे गायवाड्याची विटांची भिंत कोसळून पिंप्री येथील हिम्मत नामदेव गावंडे हे गंभीर जखमी झाले होते तर बोर्डी येथील भगवान गोविंदराव नेवारे, गौरी रंजीत वाघाळे येळवन ता.जि. अकोला हे दोघे सुद्धा जखमी झाले होते,त्यापैकी हिम्मत नामदेव गावंडे पिंप्री हे त्या दिवस पासून अकोला येथील शासकीय रुग्णालयात भरती होते तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आठ सप्टेंबर 2022 रोजी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा प्रेत पंचनामा मध्ये त्यांचे डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे रक्ताच्या गाठी होऊन त्यांचा मृत्यू झाला असे नमूद करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर राहते घरी पिंप्री खुर्द येथे 8 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.घरातील कर्ता पुरुष गेल्याने शासनाने अर्थीक मदत करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *