“चाळीस गद्दारांनी सरकार पाडल्याने प्रकल्प…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गरबा…”

Maharashtra State

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुजरातमध्ये आपला प्रकल्प उभा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

“चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या बाहेर गेले, याची जबाबदारी कोण घेणार आहे. वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, याचं उत्तर अद्यापही मिळालं नाही. जेव्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती दर्शनात व्यस्त होते. आता नवरात्र येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गरबा, दांडियासाठी न फिरता थोडेसे लक्ष द्यावे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *