पुंडा येथील शेतीचे पंचनामे करा ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अकोला

अकोट  :  तालुक्यातील पुंडा येथील शेतात 11 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पुंडा येथील तलाठी सुटीवर असल्याने गावाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी देऊन तात्काळ पंचनामे करण्यासाठी पुंडा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या अगोदर शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला नगदी पिकांचा घास मुंग उडीद याला काही शेतकऱ्यांच्या शेतामधील फुलोर जडल्यामुळे व शेंगा आल्यास नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला असून यावेळी खारपान पट्ट्यातील शेतकरी संपूर्णतः हवाली झालेला आहे यावेळी  मदतीच्या प्रतीक्षेत मध्ये आहे सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून त्याचे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनातुन केली आहे. निवेदन देताना आसेगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर कुलट, नामदेव कुलट, वैभव कुलट, गोपाल पुंडकर, राजेंद्र पुंडकर, हुतांश पुंडकर, दादाराव सपकाळ, विक्की पुंडकर, भास्कर पुंडकर, विजय कुलट, गोपाल झामरे, गोपाल कुलट, अनंता कुलट, ज्ञानेश्वर कुलट, गोपाल इंगळे, संदीप कुलट, संजय काकड, बाबाराव लांडे आदी शेतकरी उपस्थित होते.

पुंडा तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर कुलट
गावामधील तलाठी गेल्या काही महिन्यापासून सुट्टीवरच आहे त्यामुळे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे शेतकरी वर्ग मागणी करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *