राज्यात जनावरांमध्ये लम्पि आजाराचा फैलाव होत असतांना मोदी सरकार आणि शिंदे सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय..महाराष्ट्रासाठी लम्पि आजारावर आलेली औषध हे गुजरातला पाठवल्याने पशुधनाचा , मुक्या जनावरांचा श्राप या सरकारला लागणार असल्याचंही ते म्हणाले…गाई , बैल मेल्यावर 18 हजाराची मदत देण्यापेक्षा त्यांना जिवंत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या असा सल्लाही त्यांनी दिलाय…तर जनावरांचा पाप घेणार हे सरकार असून, गाईंचा आणि बैलांचा नक्कीच श्राप लागेल त्याच बरोबवर लम्पि नावाचा आजाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने सरकारला ग्रहण लावल्याशिवाय राहणार नाही अस ही ते म्हणाले..