वणी वारुळा शेत शिवारात पिकांचे नुकसान

अकोला


– शेतकऱ्यांचे तक्रारीला केराची टोपली  
अकोट  :   अकोट तालुक्यातील खारपाण पट्ट्यात मोडणाऱ्या वणी वारुळा शेत शिवारात मोडणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे झालेल्या मुसळधार पाऊस व वादळाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकारी वर्गाला वेळ नाही काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तसेच बरेच शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी विभाग यांच्या कडे सादर करुनही सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकारी वर्गाला वेळ नाही काय? अशा बाबतीत मुडगांव येथील रहिवासी व वणी वारुळा शेत शिवारात साडे तीन एकर शेती असणारे अविनाश कृष्णराव वांगे आपल्या शेतात मका ह्या पिकाची पेरणी केली व मक्याचे पिक चांगल्या परीस्थितीत असतांना ह्या परीसरात वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला त्या वादळीवाऱ्यासह पावसाने अविनाश वांगे यांच्या शेतातील मका जमिनीवर पडला व पावसामुळे मका पिकाचे कणसे खराब झाली.त्यामुळे ह्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे व पिकाचे नुकसान झाले आहे.या नुकसान झाले बाबत शेतकरी अविनाश वांगे यांनी आपल्यावर झालेली आपबिती ची  लेखी तक्रार दाखल केली .परंतु अद्याप  हि या शेतकऱ्यांकडे कोणत्याही महसूल अधिकारी व कृषी अधिकारी,व कृषी विभागाच्या एका हि अधिकारी यांनी फिरकुन हि पाहिले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्या शेतकऱ्याची मनधरणी करण्यासाठी अधिकारी वर्गाला वेळ नाही काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तेव्हा अशा परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

– वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन या पावसामुळे माझे शेतातील मका पिकाचे नुकसान झाले आहे.मि तक्रार दाखल केली होती पण अघापही माझ्या शेतात कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी फिरकुनही पाहिले नाही.तेव्हा अशा परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.तेव्हा वरीष्ठांनी शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
 अविनाश कृष्णराव वांगे शेतकरी मुडगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *