अकोट:-सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज* यांच्या असिम कृपेने ब्रांच: चोहोट्टा बा येथे दिनांक 22सप्टेंबर 2022(गुरुवार) रोजी सकाळी 11 ते 1या वेळेत परम आदरणीय महात्मा अरुण पाटीलजी (ज्ञानप्रचारक,वडाळा, मुंबई)यांच्या पावन उपस्थितीत विशेष सत्संग समारोह कृषि उ बाजार समिती चोहोट्टा बा येथील या ठिकाणी संपन्न झाला.या प्रसंगी गाव करोडी,निभोर,वरुळ कुलट,पुंडा, निजामपूर देवरडा ,टाकळी,खु, मनबदा दहिगाव अवताडे ,या ठिकाणाहून मोठ्या संख्येने संत महात्मा उपस्थित होते,या प्रसंगी संत्संगला संबोधित करताना महात्मा अरुण पाटीलजी म्हणाले, “संत निरंकारी मिशन तुमचे जात,धर्म, वेशभूषा,पेहरावा,खान पान न बदलता केवळ मनाची अवस्था बदलुन ख-या देवाशी नाते प्रस्थापित करतं.परमात्माला बघुनच भक्तीची सुरुवात होते.”या प्रसंगी चोहोट्टा बा ब्रांचचे मुखी महात्मा राधेश्याम जी निरंकारी यांनी ब्रांचच्या वतीने परम आदरणीय महात्मा अरुण पाटीलजी यांचे स्वागत केले.महात्मा समवेत प्रचार यात्रेत आलेले महात्मा रमेश जी यांनी सुंदर गिताद्वारे सत्संगला मंत्रमुग्ध केले. या सत्संगला सुचारु देण्यासाठी चोहोट्टा बा सेवादल युनिट च्या सेवादल महात्मा आणि भगिनींनी आपले योगदान दिले.