पुण्यातील ‘त्या’ घोषणाबाजीनंतर कडक कारवाई करा -नितेश राणें

Maharashtra State

– पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह होत आहे निर्माण

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणाबाजीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशाप्रकारे घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे. “यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार नाहीत” असा इशारा राणे यांनी दिला आहे. या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरू, गरज वाटल्यास घरात घुसू, असे राणे म्हणाले आहेत.“आमच्या देशात राहून कोणी जर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत असतील, तर पोलीस खात्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रवृत्तींची हिम्मत तोडण्याचे काम पोलिसांनी करावे”, असे आवाहन राणे यांनी केले आहे. आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचे आहे. देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या विरोधात आम्ही लढत आहोत. पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे राणे म्हणाले आहेत. या प्रकारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यातील हिंदूत्ववादी सरकारने या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *