अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांचा विभागाला आदेश
अकोला,दि.४
जिल्ह्यात गुटखा विक्री प्रकरणी कारवाई करावी. त्यासाठी विशेष पथक निर्माण करुन जिल्हात धाडसत्र राबवावे. गुटखा विक्री बाबत गोपनीय माहिती देणाNया खबरी व्यक्तींचे जाळे अधिक मजबूत करुन पोलीस प्रशासनाच्या मदतीने गुटखा विक्री करणाNयावर कडक कारवाई करावी. जिल्ह्यातील विटभट्टी व्यावसायिकांसाठी सुलभ नियमावली करुन त्वरित परवाना मिळेल यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
आज जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला.डॉ.शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त पंकज जवजाळ, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, विनय सुलोचने, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, माजी आमदार हरिभाऊ भदे, सामाजिक कार्यकर्ता आशाताई मिरगे आदी उपस्थित होते.
विटभट्टी व्यावसायिकांना परवाना त्वरीत द्यावा
विटभट्टी व्यावसायिकांना आवश्यक परवाना सहज व त्वरीत मिळेल याकरीता प्रशासनाने उपाययोजना राबवावी. लोकप्रतिनिधींद्वारे राबविण्यात येणाNया समाजोपयोगी उपक्रमांकरिता प्रशासनाने समन्वय राखावा, विधवा महिलांना पेन्शन, जिल्ह्यातील गुटखा व अवैध ड्रग विक्रीवरील कार्यवाही इ. विषयाचा आढावा घेवून यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.