महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्यावर मोठी जबाबदारी
लवकरच इच्छूक उमेदवारांचे अर्ज स्विकारणार
या प्रसंगी येणाNया महापालिका निवडणुकी बाबत विस्तृत चर्चा करुन लवकरच इच्छुक उमेदवार यांचेकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याचे उद्देश्याशने नियोजन करण्यात येणार आहे.
अकोला, ५ जुन
महापालिका निवडणूकीच्या दृष्टीने कामाला लागा, त्याच बरोबर जास्तीत जास्त जागा जिंकत अकोला महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यकर्ता, नेत्यांने कामाला लागावे, असे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा अकोला संपर्क मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले. डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे अध्यक्षतेखाली महानगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले होते. त्यावेळी डॉ. शिंगणे बोलत होते.
महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महापालिका निवडणुकीचे अनुषंगाने महानगर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी महानगरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा अकोला संपर्क मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे अध्यक्षते खाली केले.
याप्रसंगी महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख,आमदार अमोलदादा मिटकरी, माजी आमदार बलीराम सिरस्कार, , माजी आमदार हरिदास भदे, श्याम बाबू अवस्थी, मोहम्मद रफीक सिद्दीकी,संग्राम गावंडे,प्रा. विश्वनाथ कांबले , कृष्णा अंधारे, प्रविण कुंटे,सै युसुफ अली, फैयाज खान, संतोष डाबेराव, ,मनोज गायकवाड, नितिन झापर्डे,उषाताई विरक,सुषमा निचल,भारती निम,मंदाताई देशमुख, अब्दुल रहीम पेंटर ,याकूब पठान, ,अजय रामटेके,दिलीप देशमुख, फरीद पहलवान, अफसर कुरैशी, नकीर खान,अजय मते,अब्दुल अनीस, , देवानंद ताले,बुढन गाडेकर, संदीप तायडे,,सुधीर कहाकर ,अब्दुल अनीस, राजिक इंजिनियर, मोहम्मद फिरोज,,यश सावल,रोहित देशमुख,आकाश आकाश धवसे, अविनाश वाहुरवाघ, ताज नवरंगाबादी ,मुन्ना पहेलवान ठाकुर, बालु नेरकर, गजानन मुरुमकार, प्रामुख्याने उपस्थित होते बैठकीचे संचालन तथा आभार प्रदर्शन बुढन गाडेकर यांनी केले