रेग्युलेटर पासबुक आणि पाईपचे दर सुद्धा वाढले
दरवाढीमुळे नागरिक त्रस्त
16 जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस कनेक्शनच्या दरात वाढ करण्यात येत आहे या महिनाभरात एलपीजीच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण कठीण झाले आहे.त्याचबरोबर पेट्रोलियम कंपन्यांनी 16 जूनपासून गॅस कनेक्शनच्या दरात वाढ केल्यामुळे घरातील स्वयंपाकघर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न गृहिणींसमोर उभा राहिला आहे. जर तुम्ही एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला 3690 रुपये मोजावे लागतील तसेच गॅस शेगडी साठी वेगळे पैसे द्यावे लागतील नव्या रेग्युलेटरसाठी आता दीडशे रुपयांऐवजी अडीचशे रुपये मोजावे लागणार आहेत. पासबुकसाठी 25 रु तर पाईपसाठी 150 रुपये मोजावे लागणार आहेत. हा बदल 16 जूनपासून लागू होणार आहे. एलपीजीचे दर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.