अमरावती विभागाचा एकत्रित निकाल ९६.८१ टक्के
मुलींचा निकाल ९७.८४ टक्के
मुलांचा निकाल ९५.९२ टक्के
मुलींच्या तुलनेत ८ हजार मुले अधिक पास झाली आहे.
अकोला, १७ जुन
अमरावती बोर्डातून दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या निकाल देखील मुलींनी बाजी मारली होती. तर यंदा दहावीच्या निकालात ९७.८४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९५.९२ टक्के इतके होते. अमरावती विभागात दीड लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ७१ हजार मुली आणि ७९ हजार मुलांचा समावेश आहे. विभागात दहावीत एकूण पास होणाऱ्यांच्या संख्येत मुलांची संख्या अधिक आहे. मुलींच्या तुलनेत ८ हजार मुले अधिक पास झाली आहे.
अकोला जिल्ह्याचा निकाल हा ९७ टक्के लागला. तर बाळापूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. अकोला जिल्ह्यात ९८ टक्के मुली पास झाल्या तर ९६ टक्के मुले पास झालीत. बाळापूर तालुक्यात ९७.७८ टक्के निकाल लागला. अकोला जिल्ह्यात २४ हजार विद्यार्थी पास झाले. यात अकरा हजार ७३१ मुली होत्या. तर १२ हजार ५०१ मुले पास झालीत. अकोला तालुक्यात ९ हजार आठशे विद्यार्थी पास झाले.
अकोला जिल्ह्यात डिस्टिंग्शन मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १० हजारावर आहे. तर ग्रेड एक मध्ये ९ हजार आणि ग्रेड दोन मध्ये चार हजार मुले उत्तीर्ण झाली आहे. जिल्ह्यात आणि शहरातील अनेक शाळांचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. विभागात ९० टक्क्यांच्या वर साडे आठ हजार विद्यार्थी आहेत. तर ८५ ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १६ हजार आहे. सर्वाधिक विद्यार्थी हे ७५ ते ८० टक्के गुण मिळविणारे आहे. त्यांच्या संख्या ही तेवीस हजार आहे.
सर्व विद्याथ्र्यांना शुभेच्छा..!
1. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
2. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
३. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
स्टेप १ : वरील कुठल्याही एका संकेत स्थळावर क्लिक करा.
स्टेप २ : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप ३ : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप ४ : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप ५ : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप ६ : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा