भाजपाने विजयी गुलाल उधळला, पाच उमेदवार विजयी

Uncategorized
  • विधान परिषदेत पाच ही उमेदवार विजयी झाले. १३४ मते घेतली आहेत. महाविकास आघाडीत नाराजी आहे. आमदारांमध्ये नाराजी होती. पाचव्या उमेदवाराला मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा अधिक मते घेतली. माझे सहकारी लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी विजयला हातभार लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी आहे. महाविकास आघाडीत संघर्ष सुरु आहे. लोकाभिमुख सरकार आणे पर्यंत संघर्ष सुरु राहील. देशात मोदींची लहर महाराष्ट्र मोदींच्या सोबत आहे. चमत्कार मी मानत नाही. महाविकास आघाडीचा असंतोष मतांमध्ये परावर्तीत झाला. असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. अपक्ष, विरोधकांचे मते मिळाली. आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही जनतेसाठी संघर्ष आहे. असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
  • देवेंद्र फडणवीस यांच्या कुशाग्र बुध्दीचा हा विजय आहे – चंद्रकांत पाटील
  • विधान परिषद निवडणूकीत विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले अभिनंदन
  • सकाळी ओरडणारा पोपट ओरडणे बंद करेल. बोलणाऱ्या पोपटाचा गळा दाबा – प्रसाद लाड
  • शिवसेना -सचिन अहिर, आमश्या पाडवी 
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस – एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर 
  • भाजप – प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर
  • काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत, भाई जगताप विजयी
  • मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा – खा.अनिल बोंडे
  • भाजपा जल्लोष सुरु
  • सचिन अहीर यांनी विजय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा विजय असल्याचे सांगितले.
  • राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही महाविकासआघाडी ला झटका राज्यसभे वेळी 123 आमदार भाजपच्या बाजूने होते आता विधान परिषदेच्या निवडणुकीत 133 महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे का… विधानसभेत बहुमताचा आकडा 145 आहे.
  • फडणवीसांची जादू विधान परिषद निवडणुकीतही चालल्याचे चित्र आहे. भाजपने पहिले चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित केलं होतं. पण भाजप चा पाचवा उमेदवार विजयी झाला.विधान परिषदेच्या दहा जागेसाठी खरी लढत प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्या होती. त्यात प्रसाद लाड यांनी बाजी मारली. राज्यसभा निवडणुकीत भाजपला महा विकास आघाडीला जोरदार धक्का देत धनंजय महाडिक यांना विजयी केले. विधान परिषद निवडणुकीत भाजपने त्याचीच पुनरावृत्ती केली.महा विकास आघाडीचे एकूण 21 मत फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी झाली आणि महा विकास आघाडीच्या पसंतीला भाजप उमेदवार उतरल्याचे चित्र या संपूर्ण निवडणुकीत होते. भाजपचा पाचवा उमेदवार विजयी झाल्याने भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण होते. काँग्रेसचे हंडोरे यांचा पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का बसला आहे.
  • भाजपाच्या मित्रांनी मते दिल्याचा दावा नवनिर्वाचित आमदार नाथाभाऊ खडसे यांनी केला आहे. सहा वर्षापासून विनाकारण आरोप केल्या गेले. राजकीय पुनर्वसन राष्ट्रवादी ने केल्याचा दावा नाथाभाऊंनी केला आहे. सीडी विषय योग्य ठिकाणी इतर विषय विधान परिषदेत मांडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *